शिक्षकांना मार्चच्या वेतनापासून वंचित राहण्याची वेळ

आदेशात सुधारणा करण्याची परिषदेची मागणी
शिक्षकांना मार्चच्या वेतनापासून वंचित राहण्याची वेळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षकांच्या मार्चच्या वेतन देयकाबाबत शिक्षण संचालक यांनी 10 मार्च रोजी निर्गमीत केलेल्या आदेशात सुधारणा करण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निवेदन पाठवून केली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना मार्चच्या वेतनापासून वंचित रहावे लागणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

मार्च, एप्रिल 2021 ची देयके ही डीसीपीएसच्या कपाती ऐवजी एनपीएसच्या कपाती करून बिले स्वीकारण्याबाबत निर्देशित केले आहे. या आदेशानुसार राज्यातील सर्व अधीक्षक, वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथक यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेली माहे. मार्च 2021 ची वेतन देयके मुख्याध्यापकांच्या लॉगिनला परत केली आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मार्च, एप्रिल 2021 च्या वेतनाबाबत संकट निर्माण झाले आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डीसीपीएस धारकांच्या वेतनातून कपात न करता वेतन देयक सादर करण्याचे निर्देश देणे अत्यावश्यक आहे. यामुळे 10 मार्च 2021 ला निर्गमित केलेल्या आदेशात अंशतः सुधारणा करण्याची नितांत गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com