31 डिसेंबर पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा होणार

31 डिसेंबर पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा होणार

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

शिक्षक भरती प्रक्रिया (Teacher recruitment process) संदर्भाने उमेदवार हे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने (State Government) 31 डिसेंबर पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे आदेश राज्य परीक्षा परिषदेने (State Examination Council) दिले आहेत.

करोनामुळे (Covid 19) राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test in the State) घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या .त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेला सामोरे जाऊ पाहणाऱ्या उमेदवारांसमोर अडचण निर्माण झाल्या होत्या. परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक म्हणून सेवेत येता येत नाही. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेची अनेक उमेदवारांना प्रतीक्षा होती. ही बाब लक्षात घेऊन परीक्षा संयोजित करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण विभागात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये परीक्षा घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Maharashtra State Examination Council) वतीने शासनाच्या परवानगी नंतर परीक्षेच्या संदर्भाने अर्ज सादर करणे ,परीक्षा घेणे, निकाल लावणे यासारख्या प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरच परीक्षेची तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आता फक्त एकदाच परीक्षा -

शिक्षण हक्क कायद्याच्या आस्तित्वा नंतर पहिली ते आठवी ला शिकू पाहाणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची पात्रता पुढील सात वर्ष राहत होती. तथापि केंद्र सरकारने या निर्णयात बदल केला असून एकदा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला नोकरी लागेपर्यंत पुन्हा पात्रता परीक्षा देण्याची गरज पडणार नाही .त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com