शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली

शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने (Maharashtra State Examination Council) घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (Teacher Eligibility Test) यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार होती त्यात बदल करून 31 ऑक्टोबरला घेण्याचा आदेश परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Examination Council Commissioner Tukaram Supe) यांनी दिले आहेत.

राज्यात शिक्षक भरतीसाठी (Teacher recruitment in the state) आवश्यक असणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा गेली दोन वर्ष होऊ शकलेल्या नव्हत्या. यावर्षी कोरोणा (Covid 19) नंतर राज्य सरकारने परीक्षा (State Government Examination) घेण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी शासनाने 10 ऑक्टोबर एक तारीख निश्चित केली होती. मात्र राज्यात या परीक्षेच्या कालावधीच्या दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (Central Public Service Commission) लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान (Student Losses) होऊ नये ही बाब लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

असे असेल नियोजन-

पात्रता परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ते प्रवेश पत्र नव्या नियोजनानुसार 14 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ्याच बरोबर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर प्रथम हा 31 ऑक्‍टोबरला सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होणार असून, पात्रता परीक्षेचा व्दितीय पेपर हा दुपारी दोन ते साडेचार या वेळेत निर्धारित करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.