143 शिक्षक, शिक्षकेतरांचा करोनामुळे बळी !

143 शिक्षक, शिक्षकेतरांचा करोनामुळे बळी !

करोनाची दुसरी लाट : मदतीची प्रतिक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये (Corona second wave) जिल्ह्यामध्ये 94 माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर, तर 45 माध्यमिक शिक्षकांचा निधन झाले आहे. यामध्ये ज्या शिक्षक (Teacher) व कर्मचार्‍यांना रुग्ण सर्वेक्षण (Patient Survey to Staff), प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center), कोविड सेंटर (Covid Center) , रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी करोना रोग निवारण करण्यासाठी नेमणूक झालेली होती. त्यांना शासनाचे 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान (Grant) द्यावे, अशी मागणी (Demand) शिक्षक संघटनांकडून होत आहे.

जिल्ह्यात करोनाच्या दुसर्‍या लाट मोठ्या मृत्यू (Death) झाले. या मृत्यू तांडावात अनेकांची जवळची माणसे, नातेवाईक (Relatives), मित्र परिवार गमावला. यात माध्यमिक (secondary), प्राथमिक शिक्षकही सुटलेले नाहीत. विशेष म्हणजे या मृत पावलेल्या शिक्षकांमध्ये (Death of Teacher) 11 माध्यमिक शिक्षकांनी कोविड ड्युटी (Covid duty by secondary teachers) केलेली आहे. तर 5 शिक्षक हे नव्याने नोकरीला (New Joining teacher) लागलेले असल्याने त्यांना सरकारकडून पेन्शन आणि ग्रॅज्युटीलचा लाभही मिळणार नाही. यात काही प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. यामुळे या शिक्षकांना राज्य सरकारने विमा कवच लाभ अथवा स्वतंत्रपणे मदत द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना अहमदनगर जिल्हा माध्यमिक संघाचे जिल्हा राजेंद्र लांडे यांनी सांगितले की, जिल्ह्यात 98 माध्यमिक शिक्षकांचा करोनात बळी गेलेला आहे. या शिक्षकांना सरकारकडून विमा कवच मिळावे (Demand Government teacher Insurance), यासाठी मुख्यमंत्री (CM), शिक्षण मंत्री (Education Minister) यांच्यासह जिल्हा पातळीवर शिक्षणाधिकार्‍यांना पत्र दिलेले आहे. काही शिक्षक हे 2005 नंतर नोकरीस असल्याने त्यांना सरकारच्या नियमनूसार पेन्शनचा ही लाभ मिळणार नाही. यामुळे सरकारने या शिक्षकांच्या परिवराचा सहनुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

बळी शिक्षक कंसात माध्यमिक शिक्षक कंसाबाहेर प्राथमिक

कोपरगाव 0 (3), अकोले 6(10), संगमनेर 3 (6), श्रीरामपूर 2 (8), राहाता0 (11), नेवासा 6 (5), पाथर्डी 7 (5), शेवगाव 3 (4), जामखेड 3(4), श्रीगोंदा 7(8), कर्जत 1 (6), पारनेर 2 (8), नगर तालुका (7), नगर शहर 5(8), राहुरी 0(6).

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com