रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुका शिक्षक समिती अध्यक्षपदी दत्तात्रय गरुड तर गुरुकुलच्या अध्यक्षपदी संजय खरात यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

शिक्षक नेते डॉ.संजय कळमकर यांच्या उपस्थितीत ह्या निवडी करण्यात आल्या

गुरुकुल व समितीच्या विविध आघाड्यांच्या निवडी नुकत्याच करण्यात आल्या आहेत. शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय गरुड, सरचिटणीस लक्ष्मीकांत वाडीले, कार्याध्यक्ष नंदकुमार दिघे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सैंदाणे, जिल्हा प्रतिनिधी नानासाहेब पंडित, तालुका गुरुकुल मंडळाच्या अध्यक्षपदी संजय खरात, सरचिटणीस वाल्मिक निळकंठ, कार्याध्यक्ष गणेश पाचोरे, कोषाध्यक्ष सिद्धांत भागवत, गुरुकुल मंडळ उच्चाधिकार समिती अध्यक्षपदी संजय महानुभाव, सरचिटणीस आप्पासाहेब चौधरी, कार्याध्यक्ष कैलास वाघ, कोषाध्यक्ष तुळशीराम वसईकर.कोपरगाव तालुका गुरुकुल मंडळ महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सुनीता मोरे,सरचिटणीस श्रीमती सविता जमधडे, कार्याध्यक्ष श्रीमती अलका जाधव, कोषाध्यक्ष श्रीमती सुलोचना कुळधरण, शिक्षक समिती कोपरगाव नगरपालिकेच्या अध्यक्षपदी मुबश्शीर खान, सरचिटणीस श्रीमती मंगल बिबवे, कार्याध्यक्ष श्रीमती साखरबाई रणछोड, कोषाध्यक्ष श्रीमती रजनी खैरनार,

कोपरगाव नगरपालिका गुरुकुल मंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप वळवी, सरचिटणीस श्रीमती सरस्वती कानडे, कार्याध्यक्ष नसरीन इनामदार, कोषाध्यक्ष प्रतिभा केने.

कोपरगाव तालुका गुरुकुल डिसीपीएस संघटना अध्यक्ष श्रीकांत साळवे, सरचिटणीस लतीफखान पठाण कार्याध्यक्ष सुनील सोनोने, कोषाध्यक्ष अंकुश चव्हाण, कार्यालयीन चिटणीस भाग्यश्री गिरी, उपाध्यक्ष युसूफ खेतीवाले, रामदास कदम, संघटक निळे सोनाली, सल्लागार गणेश आतकरे, धनंजय सूर्यवंशी.

कोपरगाव तालुका गुरुकुल तंत्र स्नेही मंडळ अध्यक्ष महेंद्र गोसावी, सरचिटणीस संतोष थोरात, कार्याध्यक्ष मच्छिंद्र खैरे, सहकार्याध्यक्ष अशोक शिरसाठ, कोषाध्यक्ष अनुजकुमार ढुमणे यांची निवड करण्यात आली.

यावेळी अशोक थोरात, नवनाथ सूर्यवंशी, सिताराम गव्हाणे, विक्रम पवार, कैलास दाते, महेंद्र निकम, शोभा गाडेकर, राहुल वायखींडे, राहुल भागवत, शबनम खान, कैलास सोमासे, अनिल झाल्टे, जयंत मोरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अशोक कानडे यांनी केले तर आभार श्रीराम तांबे यांनी मानले.