
घारगाव |वार्ताहर| Ghargav
संगमनेर(Sangamner)तालुक्यातील बोटा (Bota) गावातील विद्यानगर गल्लीत अज्ञात चोरट्यांनी (Theft) धुमाकूळ घालत मंगलबाई पांडुरंग फटांगरे या शिक्षिकेच्या (Teacher) पाठीत लोखंडी रॉड मारून घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने (Gold Ornaments) व रोख रक्कम असा एकूण 76000 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे. त्याच बरोबर आजू-बाजूची तीन ते चार घरेही फोडण्याचा (Burglary) प्रयत्न केला आहे. ही घटना रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी (Ghargav Police) दिलेली माहिती अशी की, बोटा (Bota) गावातील विद्यानगर येथे मंगलबाई फटांगरे या शिक्षिका राहात आहे. नेहमीप्रमाणे त्या घराच्या खोलीत झोपल्या होत्या आणि मुलगा प्रथमेश हा आतील खोलीत झोपला होता. रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी (Theft) मुख्य दरवाज्याची आतील कडी कशानेतरी उघडून आत प्रवेश केला आणि कपाटातील रोख रक्कम 16 हजार रूपये काढले.
त्याच दरम्यान फटांगरे या झोपेतून जाग्या झाल्या मात्र चोरट्यांनी 25 हजार रूपये किंमतीचे दिड तोळे सोन्याचे मणीमंगळसूत्र, 25 हजार रूपयांचे दिड तोळे सोन्याचे मिनी गंठण, 10 हजारांची तीन ग्रॅम सोन्याची अंगठी हे सर्व फटांगरे यांच्याकडून हिसकावून घेतले मात्र त्यांनी आरडा ओरड केल्याने चोरट्यांनी लोखंडी रॉड त्यांच्या पाठीत मारला पण फटांगरे यांनी पुन्हा आरडा ओरड केल्याने मुलगा हा झोपेतून जागा झाला आणि पळत बाहेर आला. त्याला पाहून चोरटे पळून गेले. एकूण 76 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे.
या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. याप्रकरणी प्रथमेश फटांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 81/2023 भारतीय दंड संहिता कलम 394, 34 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहे.