शिक्षक भारतीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
सार्वमत

शिक्षक भारतीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

शिक्षकांच्या पेन्शनप्रश्नी विविध मागण्यांचे निवेदन शिक्षक भारतीच्यावतीने अकोले तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 15 ते 20 वर्ष अल्प मानधनावर व विनावेतन काम करणार्‍या शिक्षकांना किती दिवस वेटबिगारी सारखे राबवून घेणार, पगार नसल्यामुळे कुटूंब कसे चालवायचे? हा विचार सतत मनात येत असताना आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा विचार करून कित्येक विनाअनुदानित शिक्षकांनी आत्महत्या केली.

त्यात शालेय शिक्षण विभागाने खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियम कायद्यात सुधारणा करण्याबाबत नियमांचा नवीन मसुदा 10 जुलै 2020 रोजी प्रसिद्ध झाला. या मसुद्यामध्ये अनुदानीत शाळांची व्याख्याच बदलली आहे. या बदलामुळे राज्यातील लाखो शिक्षकांच्या पेन्शनवर टाच येणार आहे. या विरोधात राज्यव्यापी आंदोलन शासनमान्य संघटना शिक्षक भारती यांनी पुकारले होते.

शिक्षक भारती अकोलेच्या वतीने उच्च माध्यमिक जिल्हा सचिव प्रा. महेश पाडेकर, तालुकाध्यक्ष संपत वाळुंज, उच्च माध्यमिक तालुकाध्यक्ष प्रा. रोहिदास चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष सोमनाथ बातले, सचिव सुदर्शन ढगे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी तहसीलदार अकोले यांना निवेदन दिले.

राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी घरी बसून पोस्टरवर मागणी मांडून आंदोलन करणार आहे. करोनामुळे लॉकडाऊनचा फायदा घेत शिक्षण विभागाने अधिसूचना प्रकाशित केली. त्या विरोधात शिक्षक भरती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. कपिल पाटील यांनी विधान परिषद नियम 240 अन्वये अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण श्रीमती वंदना कृष्णा आणि उपसचिव श्रीमती चारुशीला चौधरी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र दिले आहे.

या आंदोलनात शिक्षक भरती संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, सचिव सुनील गाडगे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे, सचिव प्रा. महेश पाडेकर, माध्यमिक सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, बाबासाहेब रहाणे, सुदाम दिघे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, संपत वाळुंज, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, सचिन जासूद, श्याम जगताप, हर्षल खंडीझोड, संजय तमनर, कैलास जाधव, शरद कारंडे, श्रीकांत गाडगे, सुरेश जगताप, विलास वाघमोडे, नरेंद्र लहिरे आदी सहभागी झाले.

Deshdoot
www.deshdoot.com