शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी राहणे बिनविरोध

गुरुमाऊली मंडळ : उपाध्यक्षपदी उषाताई बनकर
शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी राहणे बिनविरोध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बँकेच्या समिती सभागृहात गुरूवारी बिनविरोध पार पडली.

यात अध्यक्षपदी संगमनेरचे शिक्षक राजू राहणे यांची तर उपाध्यक्षपदी श्रीगोंद्याच्या शिक्षिका उषाताई बनकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर होते.

अध्यक्षपदी राहणे यांच्या नावाची सूचना संचालक अर्जुन शिरसाट यांनी मांडली त्यास संचालक बाबासाहेब खरात यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी बनकर यांच्या नावाची सूचना संचालक सलीमखान पठाण यांनी मांडली तर अनुमोदन सुयोग पवार यांनी दिले. या निवडीसाठी बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. सर्व संचालकांनी नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी बिनविरोध केल्यामुळे आदर्श पायंडा संचालक मंडळाने घालून दिला.

या निवडीच्यावेळी जिल्हा शिक्षक संघाचे तथा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, सरचिटणीस विठ्ठल फुंदे, बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे, राजकुमार साळवे, मच्छिंद्र लोखंडे, दत्ता पाटील कुलट, भाऊराव राहिंज, आर. टी. साबळे, बाळासाहेब चाबुकस्वार, बाळासाहेब सालके, संदीप मोटे, शिक्षक बँकेचे संचालक शरद सुद्रिक, साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे, अर्जुन शिरसाट, अविनाश निंभोरे, किसनराव खेमनर, गंगाराम गोडे, बाळासाहेब मुखेकर, बाबासाहेब खरात, विद्याताई आढाव, नानासाहेब बडाख, दिलीप औताडे, राजू मुंगसे, मंजुषा नरवडे, श्रीमती सीमाताई निकम, संतोष अकोलकर, अनिल भवार, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com