शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी राहणार 30 मतदान केंद्र

प्रचाराला आला वेग || गुरूजींची स्वारी या तालुक्यातून त्या तालुक्यात
शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी राहणार 30 मतदान केंद्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला पुन्हा वेग येण्यास सुरूवात झाली आहे. सहकार खात्याने निवडणुकीत खंड पाडला. मात्र, प्राथमिक शिक्षकांनी न्यायालयाच्या मार्फत पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू करून घेतली आता. मतांचा जोगवा मागण्यासाठी गुरूजींची स्वारी या तालुक्यातून त्या तालुक्यात निघाल्या आहेत.

दरम्यान, बँकेच्या निवडणुकीसाठी यंदा 30 मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक यंत्रणा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. येत्या 16 तारखेला जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होवून त्यानंतर सोमवार दि.17 रोजी मतमोजणी होवून निकाल हाती येणार आहे. या निवडणुकीत सध्या चार मंडळात प्रचारात घमासान सुरू आहे. सत्ताधारी गुरूमाऊली मंडळा विरोधात सदिच्छा आणि बहुजन आघाडी, गुरूकुल आणि स्वराज्य आघाडी तर सदिच्छाचा रोहकले हे निवडणुकीत नशिब आजमत आहे.

यामुळे शिक्षक सभासद कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सध्या शिक्षक नेते आणि कार्यकर्ते हे शाळा संभाळून बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त दिसत आहेत. प्रत्येक मंडळ आणि गटाच्या नेत्यांनी तालुके वाटून घेतले असून सकाळपासून ते शिक्षक प्रत्येक तालुक्यात शाळानिहाय मतदारांच्या भेटी घेतांना दिसत आहेत. निवडणुकीसाठी सुरू करण्यात आलेली कार्यालय निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर बंद करण्यात आली होती. ही कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आली असून त्याठिकाणी कार्यकर्ते आणि मंडळाची गर्दी आणि वर्दळ वाढली आहे.

हा नाराज आहे, त्याला आपल्या बाजूने खेचावे लागले, असे निरोप दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते नेत्यांना दिसत आहेत. यामुळे निवडणुकीतील रंगत वाढतांना दिसत आहे. दरम्यान, निवडणूक यंत्रणेचे काम सध्या जोरात सुरू असून मतदान पत्रिका छापणे आणि अन्य नियोजनात सहकार खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याचे दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी 14 तालुक्यात 30 ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासह अन्य कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असून निवडणुकीसाठी सहकार खाते सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

असे असणार मतदान केंद्र

संगमनेर 3, नगर, 2, पारनेर 2, कोपरगाव 2, राहाता 2, श्रीरामपूर 1, जामखेड 1, पाथर्डी 2, राहुरी 2, शेवगाव 2, श्रीगोंदा 3, अकोले 3, नेवासा 3 आणि कर्जत 2.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com