जिल्हा शिक्षक बँकेसाठी चौरंगी लढत

ऐनवेळी सदिच्छा, इब्टा, थोरात गट आणि साजीर आले एकत्र || रोहकले गटाचा स्व बळाचा नारा || सत्ताधारी तांबे यांच्या सोबतीला ऐक्य मंडळ || गुरूकुलच्या कळमकर यांच्या मदतीला स्वराज्य मंडळ
जिल्हा शिक्षक बँकेसाठी चौरंगी लढत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौरंगी लढत होणार आहे. ऐनवेळी सदिच्छा मंडळाने आपले फासे आवळत इब्टा, प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट), आणि साजीर या मंडळांना एकत्र आणत बँकेच्या निवडणुकीत चौथे मंडळ उभे केले. यामुळे शिक्षक बँकेच्या निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढणार आहे. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत आता सत्ताधारी गुरूमाऊली मंडळ (बापूसाहेब तांबे गट), गुरूमाऊली (रावसाहेब रोहकले गट), गुरूकुल आणि स्वराज मंडळ तसेच सदिच्छा मंडळ आणि अन्य तिघे असे चौघे मंडळ निवडणुकीच्या रिंगाणात राहणार आहेत.

जिल्हा शिक्षक बँकेसाठी चौरंगी लढत
Video : डोंगराईचा हिरवा शालु व वाहणारे झुळूक पाणी

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी येत्या 24 जुलैला मतदानाची प्रक्रिया होणार असून त्यासाठी सोमवारी (काल) उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. बँकेचे 10 हजार 400 हून अधिक सभासद असून हे सभासद आपले मताचे दान कोणाच्या पारड्यात टाकणार हे 25 जुलैला समजणार आहे. मागील पंचवर्षीच्या सत्ताधारी गुरूमाऊली गटाचे दोन गट झाले असून यंदा सत्ताधारी तांबे गटाने सोबत ऐक्य मंडळ आणि शिक्षक भारती यांना घेतले असून संजय कळमकर यांच्या गुरूकुल मंडळाने ऐनवेळी स्वराज्य मंडळाच्या हातात हात घालत निवडणुकीला समोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. रोहकले यांच्या गटाने स्व बळाचा, सदिच्छा मंडळाने अन्य दोघ मंडळाना सोबत घेतले आहे.

जिल्हा शिक्षक बँकेसाठी चौरंगी लढत
पंढरपूर येथून परतणार्‍या पाथर्डीच्या वारकर्‍यांच्या वाहनास अपघात

आज (मंगळवारी) चिन्हांचे वाटप होणार असून त्यानंतर मंडळांची घोषणा होवून त्यानूसार प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. सध्या पाऊस सुरू असून वातावरणात कमालीचा गारवा वाढला आहे. या गाव्यात गुरूजींचे राजकारण तापणार आहे. काल जिल्हा उपनिबंधक कार्यालयात माघारीच्या दिवशी सर्वच मंडळांनी शक्ती प्रदर्शन करत मोठ्या संख्याने उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

जिल्हा शिक्षक बँकेसाठी चौरंगी लढत
जिल्ह्यातील धरणातील वाचा पाणीसाठा !

ऐनवेळी दुसर्‍यासोबत संसार

गेल्या काही दिवसांपासून आघाडीसाठी गुरूमाऊलीच्या तांबे गटासोबत स्वराज्य मंडळाची चर्चा सुरू होती. मात्र, जागा वाटपाचा निर्णय योग्य होत नसल्याने अखेर स्वराज मंडळाची मागणी कळमकर यांच्या गुरूकूल मंडळाने मान्य केली. यामुळे निवडणुकीत स्वराज्य मंडळाला ऐनवळी दुसर्‍यासोबत संसार करण्याची वेळ आली.

रोहकले गट स्वतंत्र

गुरूमाऊली मंडळातील रावसाहेब रोहकले यांचा गटाने स्वतंत्रपणे निवडणुकीला समोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जुन्या आणि नवीन असणार्‍या कोणत्याच गटासोबत न घेता एकट्याने निवडणुकीला समोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रोहकले गट स्व बळावर निवडणूक रिंगणात राहणार असून त्याचा फायदा की तोटा हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

शिंदे यांची जादू कायम

सदिच्छा मंडळाचे नेते राजू शिंदे हे दर पंचवार्षिकाला नवीन प्रयोग करणारे शिक्षक नेते आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी अन्य दोन मंडळांना सोबत निवडणुकीच्या रिंगणात चौथ्या मंडळाला उतरवले आहे. विशेष म्हणजे संघाचे थोरात गटाच्या नेत्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऐकेकाळी हे सर्वजण सदिच्छा मंडळाच्या मांडवा खाली एकत्र होते.

तांबेंच्या सोबतला ऐक्य मंडळ

जुन्या मंडळांपैकी असणार्‍या राजू निमसे यांच्या ऐक्य मंडळाने ऐन वेळी सत्ताधारी गुरुमाऊली गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कालपर्यंत स्व बळाचा नारा देणार्‍या तांबे गटाने आता आघाडी केली आहे. ऐक्य मंडळाचा तांबे गटाला कसा फायदा होणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

चिन्हावर दावे प्रतिदावे ?

बँकेच्या निवडणुकीसाठी काही मंडळानी मागणी केलेल्या चिन्हे ही सारखी आहेत. यामुळे एकाच वेळी दोन मंडळाकडून एकाच चिन्हांची मागणी होवू शकते. यामुळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देवीदास घोडेचोर यांनी प्रथम मागणी करणार्‍यांना प्राधान्यांने चिन्हांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

विकास मंडळातही चौरंगी लढत

शिक्षक बँकेसोबत होणार्‍या जिल्हा विकास मंडळाच्या निवडणुकीत चार मंडळात उभी ठाकले आहेत. याठिकाणी सत्ता मिळविण्यासाठी शिक्षक मंडळ कामाला लागली आहे. विकास मंडळ ही पूर्वी शिक्षक बँकेची मालमत्ता होती. मात्र, बँकिंग नियमामुळे तिची विश्वस्त संस्थेत रुपांतर करण्यात आले असून बँकेचे सभासद हे विकास मंडळाचे सभासद असल्याने या संस्थेची निवडणूक बँकेसोबत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com