अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

इब्टा प्रणित बहुजन मंडळ स्वबळावर प्राथमिक शिक्षक बॅकेची निवडणूक स्व बळावर लढविणार असल्याचे इब्टा प्रणित बहुजन मंडाळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे यांनी सांगीतले.

आयडियल बहुजन टीचर्स असोशिएशन नगर व बहुजन मंडळ यांचा जिल्हास्तरीय पदाधिकारी सहविचार सभा नगर येथे झाली. यावेळी बहुजन मंडळाच्या पुढील उपक्रमाचा आढावा घेण्यात येऊन नियोजन करण्यात आले.

करोना काळात लोकांना एकत्र करण्याची अडचण असतानाही केवळ इब्टा संघटनेने बेहिशेबी घड्याळ खर्च घोटाळा, जिल्हास्तर शिक्षक वेबिनार उपक्रम आयोजन, जिल्हास्तर वक्तृत्व, काव्यगायन, निबंध स्पर्धा गुण गौरव पुरस्कार आयोजन, महिला दिनानिमित्त शिक्षिका पुरस्कार, पदमश्री राहीबाई पोपेरे यांचा जीवनगौरव सन्मान असे अनेक अभिनव उपक्रम साकारून जिल्ह्यात आयडियल असणारी एकमेव अग्रेसर असणारी इब्टा संघटना म्हणून भक्कम पर्याय उभा आहे, अशी भावना राज्य उपाध्यक्ष आबा लोंढे यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ, सुहास पवार, अशोक नेवसे, अविनाश बोधक आदींनी मनोगत व्यक्त केले. नवनाथ अडसूळ, जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ, बहुजन जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे, भागवत लेंडे, सुहास पवार, रामभाऊ गवळी, अशोक नेवसे, रवींद्र रुपवते, संतोषकुमार शिंदे, अविनाश बोधक, सतिष मुंतोडे, सुनील गायकवाड, जालिंदर राऊत, रवींद्र होले, संजयकुमार लाड, शाम राठोड, विजय चिकने, परमेश्वर रणधरे, उत्तम जगधने, भानुदास तांदळे, संतोष सोनवणे, ज्ञानेश्वर घेगडमल, नंदकुमार पवार, शिवाजी गायकवाड, सुरसे, चंद्रकांत दिवटे, अशोक राऊत, दिलीप खराडे, परिमल बनसोडे, दौलत गोडे, कैलास वाघमारे, मनोहर यादव, चंद्रभान मेंगाळ, महेंद्र सुरसे, रावसाहेब सरोदे, धर्मराज घुले राजू घोडके, सुहास ठिपसे,आदी उपस्थित होते.