शिक्षक बँकेसाठी 708 उमेदवारी अर्ज

इच्छुकांची भाऊगर्दी : आज शेवटचा दिवस
शिक्षक बँकेसाठी 708 उमेदवारी अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. बुधवारी 242 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून आता एकूण प्राप्त अर्जांची संख्या 708 झाली आहे. दरम्यान आज (गुरूवार) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटा दिवस असल्याने इच्छुकांची झुंबड उडणार आहे. आज किती अर्ज दाखल होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात अर्ज विक्री होत आहे. पहिल्यादिवशी शुक्रवारी पाच अर्ज दाखल झाले होते. शनिवार, रविवारी सुट्टी असल्यामुळे अर्ज दाखल झाले नाही. मात्र सोमवारी 120, मंगळवारी तब्बल 341 तर काल बुधवारी 242 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामुळे कालपर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या 708 झाली आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी 14 तालुक्यांचे 14 सर्वसाधारण मतदारसंघ त्याचसोबत महिला राखीव, इतर मागासवर्गीय मतदारसंघ, एनटी, नॉनटिंचीग आणि भिंगार छावणी मंडळ असे मतदारसंघ आहेत. दुसरीकडे निवडणुकीतील मंडळांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जाहीरनामा तयार करण्यात मंडळातील तज्ज्ञ शिक्षक व्यस्त आहेत. गुप्त गाठीभेटी आणि बैठकांचा जोर वाढला आहे. शिक्षक बँकेची निवडणुक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.

मतदारसंघनिहा उमदेवारी अर्ज

संगमनेर 39, नगर 22, पारनेर 36, कोपरगाव 25, राहाता 26, श्रीरामपूर 33, जामखेड 33, पाथर्डी 40, राहुरी 23, शेवगाव 24, श्रीगोंदा 34, अकोले 20, नेवासा 32, कर्जत 29, भिंगार 23, अनुसूचित जाती-जमाती 52, महिला राखीव 77, ओबीसी 77 आणि एनटी 63 अशा 708 अर्जाचा समावेश आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com