शिक्षक बँक, अगस्ती कारखानांच्या निवडणुकीला ब्रेक

शिक्षक बँक, अगस्ती कारखानांच्या निवडणुकीला ब्रेक

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्यातील अतिवृष्टी त्यामुळे निर्माण झालेली पूराची स्थिती, त्याचा जनजीवनावर झालेला परिणाम, वाहतुकीत येणारे अडथळे यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन यांच्या अहवालानूसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका या आहे, त्या टप्प्यावर थांबवून त्या 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सध्या नगर जिल्ह्यात अकोल्यात अगस्ती कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम आणि जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा कार्यक्रम सुरू असून त्याला 30 सप्टेंबरपर्यंत खो बसणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.

यात विशेष म्हणजे अगस्ती साखर कारखांन्यासाठी येत्या रविवारी म्हणजे उद्या मतदान होणार होते. यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मतदान पत्रिका देखील छापून तयार आहेत. अशात निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयानेमुळे सर्वांना जोरदार झटका असणार आहे.

यासह जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी येत्या 24 तारखेला मतदान होणार असून यासाठी सध्या गुरूजींचा जोरदार प्रचार सुरू असतांना दोन महिने मतदान प्रक्रिया पुढे जाणार असल्याने गुरूजींचा चांगलाच हिरमोड होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com