शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा स्तरीय बैठक रखडली

अवघे दोन दिवस बाकी : यंदा महुर्त हुकणार की साधणार
शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा स्तरीय बैठक रखडली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी (District Teacher Award) जिल्हा परिषद (Zilla Parishad) पातळीवर असणारी जिल्हास्तरीय बैठक (District level meeting) अद्याप झालेली नाही. आता शिक्षक दिनासाठी (Teacher Day) अवघे दोन दिवस शिल्लक असून यामुळे यंदा जिल्हा शिक्षक पुरस्कारांच (District Teacher Award) मुहूर्त हुकणार की साधणार याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे (Teacher) लक्ष लागलेले आहे.

जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी (District Teacher Award) तालुका पातळीवरून प्रत्येक तालुक्यातून तीन प्रमाणे 40 शिक्षकांची (Teacher) नावे आलेली आहे. यात दोन तालुक्यातून दोनच शिक्षकांची (Teacher) नावे आलेली आहेत. केंद्र प्रमुखांच्या पुरस्कारसाठी (Center Head's Award) उत्तर आणि दक्षिण असे दोन स्वतंत्र विभाग असतांनाही एकाच विभागातून चार नावे आलेली आहेत. दरम्यान, पुरस्कारासाठी (Award) आलेल्या प्रस्तावांचे तालुका पातळीवरून परीक्षण पूर्ण झालेले असून गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पातळीवर असणार्‍या समितीच्या बैठकीला मुहूर्त लागलेला नाही.

या समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा (Zilla Parishad President) या समितीच्या अध्यक्ष आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे उपाध्यक्ष (Vice President) आहेत. शिक्षणाधिकारी प्राथमिक हे सचिव, उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती हे सदस्य, महिला आणि बालकल्याण समिती सभापती, समाज कल्याण समिती सभापती, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्ह्यातील डीएड्, बीएड् कॉलेजच्या प्राचार्याचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून सामावेश आहे. केवळ या समितीची बैठक झालेली नसल्याने जिल्हा शिक्षक पुरस्कारार्थीची नावे अंतिम करण्यात आलेली नाही. शिक्षण विभागाने धावपळ करून 40 शिक्षक आणि 4 केेंद्रप्रमुख यांच्या पोलीसांकडून पडताळी करून घेतली आहे.

दरम्यान, शिक्षक दिनासाठी (Teacher Day) दोनच दिवस बाकी असून या कालावधी समितीची बैठक झाल्यानंतर पुरस्कारार्थीची नावे अंतिम मंजूरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी किमान एक दिवसांचा कालवधी लागणार आहे. यामुळे यंदा शिक्षक (Teacher) पुरस्कारांचा मुहूर्त अडचणीत आला आहे.

वेतन वाढ बंद केल्याने उत्साह संपला

पूर्वी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना राज्य सरकारकडून वेतन वाढ देण्यात येत होती. मात्र, राज्य पातळीवरून ही वेतनवाढ बंद करण्यात आलेली आहे. यामुळे शिक्षकांमधील पुरस्कारासाठीचा उत्साह कमी झाल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com