शिक्षक घुले यांचा नवीन गणित सुत्रांचा शोध

शिक्षक घुले यांचा नवीन गणित सुत्रांचा शोध

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'मद राईट अँगल' मासिकानेही घेतली दखल

पाथर्डी | नारायण पालवे

शाळेमध्ये शिकत असताना कंटाळवाणा वाटणारा गणित विषय सोपा व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल गोडी, आवड निर्माण व्हावी यासाठी पाथर्डी तालुक्यातील एकलव्य शिक्षण संस्थेच्या दामुआण्णा माध्यमिक विद्यालय भिलवडे या माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत असणारे विक्रम आसराजी घुले (एमएससी.बी.एड.) यांनी जागतिक दर्जाच्या गणित तज्ज्ञांना आव्हान देणाऱ्या नवीन व अत्यंत सोप्या अकरा गणित सुत्रांचा शोध लावला आहे.

शिक्षक घुले यांचा नवीन गणित सुत्रांचा शोध
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

या नवीन अकरा गणित सुत्रांपैकी समद्विभूज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याची सोपी पद्धत, फक्त कर्णावरून काटकोन, त्रिको क्षेत्रफळ काढणे, केवळ निरीक्षणाने घनमूळ काढणे, एकक स्थानी ९ अंक असलेल्या संख्येचा वर्ग करणे, काटकोन त्रिकोणाचा कर्ण व मोठी बाजू दिली असता सोप्या पद्धतीने लहान बाजू शोधणे, वर्ग करण्याची नवीन सोपी पद्धत, वर्तुळाचे क्षेत्रफळ हे वर्तुळाचा परीघ व वर्तुळाची त्रिज्या यांच्या गुणाकाराच्या निम्मे असते अशा गणित सुत्रांचा घुले यांच्या संशोधनात समावेश आहे.

शिक्षक घुले यांचा नवीन गणित सुत्रांचा शोध
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

शिक्षक घुले यांच्या गणितांच्या सुत्रांची दखल बंगळूरू (कर्नाटक) येथील विप्रो कंपनीचे संस्थापक, प्रसिध्द उद्योजक अजीज प्रेमजी यांच्या नावाने असलेल्या अजीज प्रेमजी विद्यापीठाच्या 'मद राईट अँगल' या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासिकाने घेऊन नोव्हेंबर २०२१ च्या त्रैमासिकात पान नंबर ६३ वर गणित सुत्रांचा लेख प्रकाशित केला आहे.

शिक्षक घुले यांचा नवीन गणित सुत्रांचा शोध
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

गणितातील संशोधनाबद्दल शिक्षक घुले यांना यापुर्वी अनेक वेळा तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवरील पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे गणिती प्रकल्प जिल्हास्तरीय गणित, विज्ञान प्रदर्शनात कौतुकास पात्र ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

शिक्षक घुले यांचा नवीन गणित सुत्रांचा शोध
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com