शिक्षकांंच्या सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी 660.46 कोटी रूपये

शिक्षकांंच्या सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी 660.46 कोटी रूपये

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील अकृषी विद्यापीठे व शासकीय तसेच अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गाना तसेच इतर संस्थांतील पात्र शिक्षक संवर्गास सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे अनुज्ञेय असलेली थकबाकीतील पहिल्या टप्प्यात निम्मी म्हणजे 660.46 कोटी रूपये वितरीत करण्यात येत आहे.

याबाबतचे परिपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केले आहे. दुसर्‍या टप्प्यातील रक्कम वितरीत करण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे. संबंधित शिक्षक आणि कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2016 ते 31 मार्च 2019 या कालवधीतील थकबाकीची रक्कम दोन टप्प्यात वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार केंद्र शासनाकडून प्राप्त 50 टक्के रक्कम म्हणजे 1320.93 कोटी रूपये दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. यामधील पहिल्या टप्प्यातील 660.46 काटी रूपये वितरीत करण्यात येत असून त्यातून थकबाकीची रक्कम अदा केली जाणार आहे.

थकबाकी राज्य 5 वर्षांत देणार

राज्य शासनाची 50 टक्के म्हणजे 1320.93 कोटी यापैकी प्रतिवर्षी 264 .18 कोटी याप्रमाणे 2012 या आर्थिक वर्षापासून पुढील 5 वर्षांत पाच समान हप्त्यात अदा करण्यात येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com