शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन नोंदवली जाणार

शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन नोंदवली जाणार

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यातील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची हजेरी यापुढे महा स्टुडन्ट पद्वारे नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील बोगस विद्यार्थी उपस्थितीला आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारच्यावतीने पी.जी. आय निर्देशांक निश्चित करण्यात देशातील प्रत्येक राज्याचा निर्देशांक गुणांच्या आधारे नोंदविण्यात येतो .त्यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल स्वरूपात नोंदविण्यासाठी गुण ठेवण्यात आले आहेत. राज्य शासनाने यापूर्वीच विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थिती नोंदविण्यासाठी सरल प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत .त्या दृष्टीने राज्य शासनाने महा स्टूडेंट अ‍ॅपला मान्यता दिली आहे. सदरचे अ‍ॅप गुगल प्लेस्टोर वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या पद्वारे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती सरळ प्रणालीशी जोडली जाणार आहे. शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती देखील यावरती नोंदविण्यात येणार असून यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांची हजेरी पत्रक वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाहीत. तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याचीही गरज राहणार नसल्याचे शासनाने जाहीर केले आहे .यामुळे राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांची शाळा तालुका केंद्र व जिल्हानिहाय उपस्थिती कळण्यास मदत होणार आहे.

गैरकारभाराला आळा बसणार

राज्यातील विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवून काही शाळा शासनाच्या विविध योजनांचा लाभ उठवत असतात. त्यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार सहन करावा लागतो. तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्यास त्या दिवशी उपस्थिती दाखवून शालेय पोषण आहार योजनेचा ही फायदा घेण्यात येत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच करण्यात आल्या होत्या. मात्र आता प्रत्येक विद्यार्थ्यांची डिजिटल स्वरूपातील नोंद घेण्यात येणार असल्यामुळे यासारख्या गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नेटवर्क नसलेल्या शाळांच्या उपस्थितीवर प्रश्न

राज्यातील आदिवासी ,डोंगराळ व ग्रामीण क्षेत्रात अनेक ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाडीवस्तीवर असलेल्या शाळा व विद्यार्थी शिक्षकांच्या उपस्थितीच्या नोंदी प वरती कशा नोंदविणार असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.राज्यात आजही अनेक भागात भ्रमणध्वनी साठी आवश्यक असणारे नेटवर्क उपलब्ध नसल्याने ऑनलाईन कामे करण्यासाठी शिक्षकांना तालुक्याला यावे लागते. मात्र शासनाने आता निर्णय घेतला असल्यामुळे त्या शाळांसमोर प्रश्न निर्माण होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com