हवा भरताना टायर फुटून एकाचा मृत्यू, एक जखमी

हवा भरताना टायर फुटून एकाचा मृत्यू, एक जखमी

शिरूर |प्रतिनिधी| Shirur

तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे एका मालवाहतूक ट्रकमध्ये हवा भरत असताना टायर फुटल्याने एका कामगारा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

जयराम हिरदुराम कश्यप (22, सध्या पाचंगेवस्ती, ढोकसांगवी, ता. शिरूर जि. पुणे, मुळ रा. किरवामुडापरा, छत्तीसगड) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत रविकांत सुरेश कुमार ( रा. ढोकसांगवी, ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. जगदीशपुर, बिहार ) यांनी रांजणगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

त्यानुसार जयराम कश्यप हा मालवाहतूक ट्रकच्या स्टेपणीमध्ये हवा भरण्याचे काम करत होता. त्यावेळी हेल्पर अखिलेश कुमार हा त्याला मदत करत असताना फिर्यादी रविकांत कुमार यांना अचानक मोठा आवाज आल्याने ते पळत मालवाहतूक ट्रक जवळ आले. तेव्हा स्टेपणीचा टायर फुटलेला दिसला. तसेच तेथे काम करणारा जयराम कश्यप हा स्टेपणीचे बाजुला पडलेला होता आणि त्याच्या तोंडावर आणि डोक्यास मार लागून रक्त येत होते.

तसेच हेल्पर अखिलेश कुमार याला देखील हातास मार लागला होता. त्यानंतर या दोघांना तातडीने शिरूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीपूर्वी जयराम कश्यप हा मृत झाला असल्याचे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com