
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कोर्ट यार्ड इमारतीमधील पाच गाळे महापालिकेने कराच्या थकबाकी पोटी सील केले आहेत. मनपाच्या सावेडी प्रभाग कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली. एका गाळ्याची थकबाकी भरल्याने त्यावरील कारवाई टळली.
मालमत्ताधारक टी. आर. थोलार यांच्या कोर्ट यार्ड या अपार्टमेंटमधील गाळा क्रमांक 502, 503, 505, 604, 605 या गाळ्यांची मालमत्ता कराची चार वर्षांपासून थकबाकी आहे. त्यांना वारंवार सूचना देऊनही कर न भरल्याने त्यांचे गाळे सील करण्यात आले. गाळा क्रमांक 606 ची थकबाकी भरण्यात आल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली.
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशानुसार व प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक संजय उमाप, वसुली कर्मचारी सूर्यभान देवघडे, अनिल पवार, रफिक देशमुख, मंजाबापू लहारे, सागर जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.