युवकांनी गरजू व्यक्तींपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवावी - तहसीलदार पाटील

युवकांनी गरजू व्यक्तींपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवावी - तहसीलदार पाटील

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. परंतु अनेक नागरिकांना या योजनेची माहिती नसते. त्यामुळे युवकांनी समाजातील गरजू व्यक्तींपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोेेेहचवावी, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले.

टायगर ग्रुपच्यावतीने मंगळवार दि. 2 नोव्हेंबर 2021 रोजी बाजारतळ येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरप्रसंगी ते बोलत होते. टायगर ग्रूपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष बबन जाधव व उपाध्यक्ष संदीप साठे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रशांत पाटील, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक रवि पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेवक दीपक चव्हाण, प्रकाश ढोकणे नगरसेविका वैशाली चव्हाण तसेच अर्जुन दाभाडे, सोनू बेग, मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, मंजू शेळके, विजू पवार, संदीप वाघमारे, सिध्दार्थ सोनवणे उपस्थित होते.

यावेळी तहसलदार पाटील म्हणाले, युवकांनी चुकीच्या मार्गाकडे न वळता योग्य मार्गाने जाऊन समाजाचा उत्कर्ष करावा. रक्तदान हे जीवनदान आहे. युवक वर्ग तालुका, जिल्ह्याची ताकद आहे, ही ताकद चांगल्या मार्गाकडे वळविण्याचा प्रयत्न करावा. तहसिल कार्यालयामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. परंतू वयस्कर तसेच अशिक्षित नागरिकांना या योजनेची माहिती नसते. त्यामुळे ते या योजनांपासून वंचित राहतात. युवकांनी वंचित नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना मदत केली तर निश्चितच अशा वंचित नागरिकांना योजनांचा आम्ही लाभ मिळवून देवू.

नगरसेवक रवी पाटील म्हणाले, श्रीरामपूरमध्ये टायगर ग्रुपनेच मदत गोळा करुन पुरग्रस्तांना पाठविली तसेच समाजात आलेल्या संकटाचे वेळी टायगर ग्रूप नेहमीच अग्रेसर असतो. अन्यायग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न ग्रुपचे सदस्य करतात.

यावेळी टायगर ग्रूपचे अविनाश गायकवाड, राहुल वाघमारे, मच्छिंद्र बहिरे, सचिन शरणागत, माऊली जाधव, सद्दाम शेख, प्रविण वैरागर, आकाश शिंदे, चंद्रकांत गायकवाड, अस्लम शेख, रोहित शिंदे, नासीर सय्यद, अरुण शिंदे, शुभम बनसोडे, विशाल सुरडकर, आदि बर्डे, सुनील साठे, विशाल सोनवणे, अजय आहेर, शुभम बिलवरे, आकाश बहिरे, झहीर पठाण, अतुल तारगे, अक्षय सूर्यवंशी, सोहेल पठाण, कुणाल सूर्यवंशी, संतोष मोरे, कपिल पाखरे, सोहेल शेख, अय्याज शेख, किशोर वराडे, नागेश बहिरे, सचिन राठोड, सचिन खैरनार, दिनेश सकट, प्रशांत साबळे, शुभम निकम, ताया शिंदे, शुभम भोजने, बापजी शिंदे, सुनील कर्पे, आकाश पटारे, टिपू विळस्कर, शेखर साठे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बबन जाधव व संदीप साठे यांनी विशेष परिश्रम घेतले.सचिन शरणागत यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.