वाहनाच्या धडकेत तरस ठार

उपाययोजना करणे गरजेचे
वाहनाच्या धडकेत तरस ठार

संगमनेर | तालुका प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्याच्या नादात आत्तापर्यंत अनेक वन्य प्राण्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. ही मालिका नववर्षातही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. चंदनापुरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावर आणखी किती वन्य प्राण्यांना आपले जीव गमवावे लागणार आहे असा सवाल वन्यजीवप्रेमींनी केला आहे.

वाहनाच्या धडकेत तरस ठार
बंधाऱ्यात आढळला तरुणाचा मृतदेह, दहा दिवसांतील दुसरी घटना... आत्महत्या की घातपात? गूढ कायम

चंदनापुरी घाटात बुधवार ( दि.११) जानेवारी सकाळी दोन ते अडीच वर्षांचे तरस पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मृतावस्थेत पडलेले होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तेथे गर्दी केली होती. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच भाग एकचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नामदेव ताजणे यांच्यासह आदिंनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत तरसाला चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात आणलेे.

वाहनाच्या धडकेत तरस ठार
मोठी दुर्घटना! दरीत कोसळून लष्कराचे तीन जवान शहीद

यापूर्वीही पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्याच्या नादात बिबटे, तरस आदी वन्य प्राण्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. काही महिन्यांपूर्वीच चंदनापुरी घाटात महामार्ग ओलांडताना एका कारच्या बोनटमध्ये बिबट्या अडकला होता. वारंवार महामार्गावर अशा पद्धतीने वन्य प्राण्यांना आपले जीव गमवावे लागत असल्याने वन्यजीवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आणखीन किती वन्य प्राण्यांना जीव गमवावे लागणार आहे असा सवालही उपस्थित केला आहे.

वाहनाच्या धडकेत तरस ठार
अचानक ट्रॅक्टरसमोर येऊन उभा राहिला बिबट्या अन्..., पुढं जे घडलं ते थक्क करणारं

भुयारी मार्ग होणे गरजेचे..

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेखिंड परिसर, बामन ज्योती परिसर, माहुली घाट, डोळासणे, कर्जुले पठार, चंदनापुरी घाट व आनंदवाडी याठिकाणी महामार्ग ओलांडण्याच्या नादात बिबटे, तरस आदी वन्य प्राण्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे वरील सर्व ठिकाणी भुयारी मार्ग झाल्यास वन्यप्राण्यांचे जीव तरी जाणार नाही. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाहणी देखील केलेली आहे. मात्र, अजून काही प्रत्यक्षात काम होईना. तोपर्यंत वन्यजीवांचे असेच बळी जाणार हे तितकेच खरे.

वाहनाच्या धडकेत तरस ठार
जिकडे तिकडे बिबटेच बिबटे, सांगा आम्ही शेती करू कशी?; बळीराजाचा आर्त सवाल

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com