ड्युटी लावण्यावरून तारकपूर एस. टी. आगारात राडा

तोफखाना पोलिसांत सात जणांविरूध्द गुन्हा
ड्युटी लावण्यावरून तारकपूर एस. टी. आगारात राडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एस.टी. बसच्या चालक-वाहकांच्या ड्युट्या लावण्यावरून चालक व वाहकांसह चार-पाच जणांच्या टोळक्याने शहरातील तारकपूर आगारात धिंगाणा घालत कार्यालयातील कर्मचार्‍यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत तारकपूर आगारातील कर्मचारी रोहित बाळासाहेब रोकडे (वय 32 रा. खडकी ता. नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रोकडे हे एस.टी. महामंडळाचे कर्मचारी असून त्यांच्याकडे तारकपूर आगारातील चालक-वाहकांच्या ड्युटी लावण्याचे काम आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ते कार्यालयात कर्तव्यावर असताना तेथे वाहक गणेश रंगनाथ फाटक, चालक शिवनाथ गजाबा खाडे, आदित्य गणेश फाटक व इतर 4 अनोळखी इसम आले व त्यांनी रोकडे यांना ड्युटी लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. सदरचा प्रकार रोकडे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितला. त्यानंतर त्यांच्या सुचनेनुसार रोकडे यांनी शुक्रवारी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी चार ते पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com