तारकपूर आगारात चोरी करताना एकाला पकडले

तारकपूर आगारात चोरी करताना एकाला पकडले
चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तारकपूर आगाराच्या कार्यशाळेत उभ्या केलेल्या मालवाहतूक ट्रकमधील बॅटरी व वायर चोरताना एकाला पकडण्यात आले आहे. राहुल डनियल मोहिते (रा. भारस्कार कॉलनी, लालटाकी, अहमदनगर) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून डेपो मॅनेजर अभिजीत साहेबराव आघाव (वय 31 रा. श्रीराम चौक, सावेडी) यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तारकपूर आगारातील कार्यशाळेत एसटी महामंडळाच्या परभणी विभागाची मालवाहतूक ट्रक (एमएच 20 बीएल 2935) पार्क केली होती. मंगळवारी सायंकाळी डेपो मॅनेजर आघाव कार्यशाळेत फेरफटका मारत असताना त्यांना एक व्यक्ती ट्रकमधील बॅटरी व वायर चोरताना दिसून आला. त्यांनी कर्मचारी मुजम्मील सय्यद व कैलास अंभोरे व इतर कर्मचार्‍यांना बोलावून घेत त्या चोरट्यास पकडले. त्याने त्याचे नाव राहुल मोहिते सांगितले. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com