तपोवन रोड कागदावर पूर्ण

प्रत्यक्षात अनेक कामे अद्याप बाकी असल्याचा अॅड. टोकेकर यांचा आरोप
तपोवन रोड कागदावर पूर्ण

अहमदनगर | प्रतिनिधी

तपोवन रोडचे काम कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक कामे बाकी असल्याचे दिसून आले आहे. अपिलीय माहिती अधिकारातून हे समोर आल्याचे कॉ. अॅड. सुधीर टोकेकर यांनी सांगितले.

२०१८ मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेमधून महाल ते इंद्रायली हॉटेल असा ३ किलोमीटर रोड डांबरीकरणसाठी मंजूर झाला. रोड पूर्ण करण्यासाठी १५ मे २०२१ हा दिवस उजडला. तब्बल ३ वर्षे या कामाला लागली.

तपोवन रोडचे काम पूर्ण झाले नसल्याबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हा सहसेक्रेटरी अँड. सुधीर टोकेकर यांनी महाराष्ट्र ग्रामीण रास्ते विकास संस्था प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता तथा अपिलिय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यास उत्तर न मिळाल्याने अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपिल केले होते. त्यानुसार १३ सप्टेंबर २०२१ रोजी सुनावणी झाली.

हा रोड ३० एप्रिल २०२१ रोजी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्यक्षात मात्र या रोडचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक त्रुटी आहेत. काम पूर्ण झाल्याबाबतची काही कागदपत्रे संबंधितांनी दिलेली नाही. एप्रिल २०२१ पर्यंत काम पूर्ण झाल्याची देण्यात आलेली माहिती दिशाभूल करणारी आहे, अँड. टोकेकर यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.