कडीतसह पाच गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 33 कोटींची मंजुरी - आ. विखे

कडीतसह पाच गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 33 कोटींची मंजुरी - आ. विखे

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत कडीत बुद्रुक व श्रीरामपूर तालुक्यात समाविष्ट असलेल्या पाच गावांकरिता प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजनेच्या कामास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 32 कोटी 91 लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

कडीत बुद्रुक व श्रीरामपूर तालुक्यात समाविष्ट असलेल्या पाच गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटावा म्हणून केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रस्तावीत योजनेच्या कामाकरिता उपलब्ध होणार्‍या 32 कोटी 91 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या गावातील पाणी योजनेच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कडीत बुद्रुक आणि अन्य पाच गावांच्या पाणी योजनेसाठी निधी मंजूर झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आ. विखे पाटील यांचे आभारही मानले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com