नळ पाणीपुरवठा सुरू करा; कुकाण्यात आज रास्तारोको

नळ पाणीपुरवठा सुरू करा; कुकाण्यात आज रास्तारोको

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

पाणीपट्टी थकबाकीच्या कारणावरून 18 सप्टेंबरपासून बंद करण्यात आलेला कुकाणा गावाचा नळ

पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी आज गुरुवार दि.1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता नेवासा-शेवगाव रस्त्यावर कुकाणा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

तालुक्यातील कुकाणा गावाचा नळ पाणीपुरवठा पाणी पट्टी थकबाकीच्या कारणास्तव गेल्या पंधरा दिवसांपासून संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीने बंद केलेला आहे. जनतेलाच वेठीस धरले जात असल्याची आंदोलनकर्त्यांची तक्रार आहे.

कुकाण्यात उद्या पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास गुरुवार दि.1 ऑक्टोबर रोजी स. 9 वा. कुकाणा येथे आंदोलन करणार असल्याचे निवेदन पं. स.चे माजी उपसभापती अशोकराव मंडलिक, माजी सरपंच एकनाथ कावरे, सुभाष चौधरी, राजेंद्र म्हस्के यांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांना दिले.

आंदोलनकर्त्यांनी दि.30 रोजी रास्तारोकोचे निवेदन पोलीस निरिक्षक डेरे यांना दिले. यावेळी निरिक्षक डेरे यांनी गटविकास अधिकारी शेखर शेलार यांच्याशी संपर्क करून कुकाण्याचा पाणीपुरवठा 24 तासांत म्हणजेच गुरुवारी सुरू करणार असल्याचे सांगितले.

आंदोलनकर्त्यांनी संयम बाळगावा

कुकाण्याचा नळपाणी पुरवठा 24 तासांत सुरळीत होणार असून आंदोलनकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी ग्रामस्थांना सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com