अनधिकृत नळ कनेक्शन तोडणार

आयुक्तांकडून तातडीची बैठक || अडथळा करणार्‍यांवर कारवाई
अनधिकृत नळ कनेक्शन तोडणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अनधिकृत नळ कनेक्शन तपासणीची मोहीम (Unauthorized Tap Connection Inspection Campaign) हाती घेऊन सात दिवसांत अहवाल द्या. त्यानंतर नळ तोडणी मोहीम (Tap Cut Campaign) राबवा. कोणालाही घाबरायचे कारण नाही. जो कोणी मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करेल त्याच्यावर कलम 353 अन्वये गुन्हा दाखल (Filed a Case) करा, असा थेट आदेश महापालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे (Municipal Commissioner Dr. Pankaj Jawale) यांनी दिला आहे.

अनधिकृत नळ कनेक्शन तोडणार
रस्त्यांची दुरवस्था अन् रखडलेल्या कामांनी गाजणार सभा

आयुक्तांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक (Water Supply Department Meeting) घेवून स्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, अहमदनगर महानगरपालिने नगरकरांना निरंतर सेवा द्यायची आहे. त्यानुसार उपयोजना होणे गरजेचे आहे. संपूर्ण नगर शहराला दिवसाआड पाणी देण्यासाठीचे नियोजन करा. अनाधिकृत नळ कनेक्शनची माहीम (Unauthorized Tap Connection Inspection Campaign) हाती घेऊन सात दिवसात अहवाल द्या. त्यानंतर नळ तोडणी मोहीम राबवावी कोणालाही घाबरायचे कारण नाही. जे कोणी मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करेल त्याच्यावर 353 चा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात येईल. प्रत्येक नगरकरांशी कर्मचार्‍यांनी समंजसेने व प्रेमाने वागा, असा सल्लाही त्यांनी दिला.

अनधिकृत नळ कनेक्शन तोडणार
हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

अमृत पाणी योजनेचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण करून फेज टू पाणी पाणी योजना (Phase 2 Water Scheme) संपूर्ण शहरात कार्यान्वित करा. जुन्या पाईपलाईन बंद करा. नगरकरांनी फेज टू पाणी योजनेचे नळ कनेक्शन (Tap Connection) घेण्यासाठी सहकार्य करावे. जेणेकरून नगरकरांना स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा (Water supply Full Pressure) होईल. नगर शहर पूर्णपणे टँकर मुक्त करायचे आहे.

अनधिकृत नळ कनेक्शन तोडणार
अन्न प्रशासनाने 21 हजारांचा गुटखा पकडला

यासाठी पाणीपुरवठा विभागाने चोखपणे काम करावे. कामात दिरंगाई व हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. पाणीपुरवठ्याचा खर्च व वसुलीमध्ये मोठी तफावत आहे. यासाठी पाणीपट्टी भरण्याचे नागरिकांकडून नियोजन करावे.

कनेक्शन नियमित करून घ्यावे

मुकुंद नगर भागाला दिवसाआड पाणी देण्यासाठी फेज टू पाणी योजना कार्यान्वित करा. मुकुंद नगर मधील पाण्याची टाकी भरावी. मुकुंद नगर मधील सुमारे 1 हजार नळ कनेक्शन अनधिकृत आहेत. या नळ कनेक्शनना नियमित करून घ्यावे. अन्यथा नळ कनेक्शन तोडणी मोहीम राबविण्यात येणार आहे, असे आदेश पाणीपुरवठा विभागाला आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com