तंटामुक्ती अध्यक्ष निवडीची चौकशी करावी

अन्यथा 6 डिसेंबर रोजी आत्मदहन करणार-सुप्रिया धुमाळ
तंटामुक्ती अध्यक्ष निवडीची चौकशी करावी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

टाकळीभान गावचे रिक्त असलेले तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद निवड तंटामुक्ती समितीच्या जीआर प्रमाणे झालेले नाही. ग्रामपंचायत सदस्याने सत्तेचा गैरवापर करून सदरची नियुक्ती करुन घटनेची पायमल्ली केली आहे. या अध्यक्ष निवडीची सखोल चौकशी करावी अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी दि. 6 डिसेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा सुप्रिया प्रकाशराव धुमाळ यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, टाकळीभान ग्रामपंचायत सत्ताधार्‍यांनी ग्रामसभेच्या वेळेस गुंडागर्दी करून राज्यघटनेची पायमल्ली करून ग्रामसभा उधळून लावली व ग्रामपंचायत कार्यालयात जावून सदरच्या पदाची नियुक्ती केली आहे. तसेच ग्रामसभेची व सदर नियमबाह्य केलेल्या अध्यक्षेची व्हीडीओ रेकॉर्डिग जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य विभागाच्या अधिकार्‍यांना पाठविले आहे. ग्रामसभेत वरील व्यक्तीची कागदपत्रे दाखविण्याची विनंती केली असता त्यांनी तेथून दुसरेच कागदपत्रे दाखवविली.

ग्रामविकास अधिकार्‍यांना ग्रामसभेची माहिती विचारली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देऊन नाकारले. तरी याबाबत महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्त अध्यादेश तपासून पहावा म्हणजे सर्व सत्य बाहेर येईल. त्यांनी घटनेची पायमल्ली केली आहे. हे स्पष्ट होईल. तरी या घटनेची आपण सखोल चौकशी करावी व जनतेला लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सौ. धुमाळ यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com