पशुपालकांना सात टक्के दराने कर्ज; जिल्हा बँकेचा निर्णय- तनपुरे

पशुपालकांना सात टक्के दराने कर्ज; जिल्हा बँकेचा निर्णय- तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

केंद्र शासनाच्या मदतीने जिल्हा सहकारी बँकेने पशुपालकांना जे कर्ज दिले, त्याची परतफेड दि.31 मार्चपर्यंत केल्यास केंद्राच्या

या योजनेचा लाभ मिळण्याबरोबरच जिल्हा सहकारी बँक पुन्हा या पशुपालकांना सातटक्के व्याजदराने कर्जपुरवठा करणार असल्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेच्या नुतन संचालक मंडळाच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला, अशी माहिती जिल्हा सहकारी बँकेचे राहुरीचे नुतन संचालक अरुण तनपुरे यांनी दिली. तसेच या योजनेचा पशुपालकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

केंद्राने योजना आणल्यानंतर पशुपालकांनी कर्ज उचलल्यानंतर 31 मार्चपर्यंत कमीच कालावधी पशुपालकांना मिळाला. तरी या योजनेचा लाभ मिळण्याबरोबरच पशुपालकांना मदत होण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने सर्वानुमते या निर्णयास पाठिंबा दर्शविला. शेतकर्‍यांना येणार्‍या तीनलक्ष रुपयापर्यंत कर्ज बिनव्याजी मिळणार असून यासाठी शेतकर्‍यांनी घेतलेली सर्व कर्ज वेळेवर भरून कर्जयोजना व्याज सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बँकेच्या सर्व शाखांमधून शेतकर्‍यांना सातबारा व 8 अ चे उतारे ऑनलाइन मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याचबरोबर राहुरीच्या मुख्य शाखेचे अद्यावत व प्रशस्त कार्यालयाचे काम सुरू असून लवकरच राहुरी मुख्य कार्यालय शाखा ग्राहकांच्या सेवेत कार्यरत होईल, जिल्हा बँकेची निर्मितीच शेतकर्‍यांसाठी झाली असून नुतन संचालक मंडळ सर्वानुमते शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत होण्यासाठी प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही अरुण तनपुरे यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com