पिंपळनेरला लोकजागृतीचे आत्मक्लेश आंदोलन

टँकर घोटाळा प्रकरण दडपण्याच्या प्रकाराचा निषेध
पिंपळनेरला लोकजागृतीचे आत्मक्लेश आंदोलन

पारनेर तालुका |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यात नुकताच उघड झालेला कोट्यवधी रुपयांचा टँकर घोटाळा सध्या दडपला जात असल्याचे आरोप करत याचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील पिंपळनेर येथे लोकजागृती सामजिक संस्थेचा सामूहिक आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

यावेळी लोकजागृतीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले, उच्च न्यायालयाने पाणी घोटाळा झाला असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. परंतु सरकारी फिर्यादी व पोलिसांनी घोटाळेबाजांना पूरक व सोईची ठरतील, अशी कलमे लावून हा गुन्हा दाखल केला. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार राळेगण सिध्दीचे आहेत. ते या तपासात दबावतंत्र, राजकीय हस्तक्षेप करून कट कारस्थाने करत आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचेकडेही या घोटाळ्याची तक्रार करण्यात आली होती. परंतु त्यांनी या मागणीला केराची टोपली दाखविली. त्यामुळे व्यथित होऊन लोकजागृती सामाजिक संस्था व त्यांचे सर्व कार्यकर्ते हतबल व दुखीः झाले. म्हणून त्यांनी अखेरीस आत्मक्लेश आंदोलनाचा मार्ग निवडला. आत्मक्लेश केल्यानंतर घोटाळेबाजांवर कडक कारवाईची सुबुद्धी संबंधितांना द्यावी यासाठी प्रार्थना केली असल्याचे संस्थेचे सचिव बबन कवाद यांनी सांगितले. लोकजागृती सामाजिक संस्थेचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टंँकर घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार हे राळेगण सिद्धीतील व अण्णांचे सहकारी आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. त्यांनी दखल न घेतल्यास आम्ही थेट राळेगण सिद्धीत आंदोलन करू.

- रामदास घावटे, अध्यक्ष लोकजागृती सामाजिक संस्था

Related Stories

No stories found.