नगर-पुणे महामार्गावर टँकर पलटी; चालक गंभीर जखमी

नगर-पुणे महामार्गावर टँकर पलटी; चालक गंभीर जखमी

पारनेर | तालुका प्रतिनिधी

नगर-पुणे महामार्गावरील ब्लॅक स्पॉट असलेल्या नारायणगव्हाण येथे टँकर लाईट पोलला धडकून पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघात टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी वैद्यनाथवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना टँकर (MH 14 KA 2722) अरुंद रस्तामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टँकर एका लाईट पोलवर धडकली व पलटी झाली. टँकर पलटी झाल्यावर चालकाचे पाय गुंतले होते.

चालकाचे पाय गुंतलेले पाहुन नारायणगव्हाण मधील युवक शुभम काळे, अक्षय कांडेंकर, मनोज शेळके, संभाजी कांडेकर, सादीक शेख यांनी आपल्या जीवाची परवा न करता जॅक व इतर साहित्य वापरुन चालकाला बाहेर काढले व त्याला रुग्णालयात दाखल केले. स्थानिक युवकामुळे चालकाचे प्राण वाचले .

दरम्यान नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण व सुपा गावात रोडचे काम झाले नसून रस्ता दुभाजक नसल्यामुळे अपघात नेहमी होत आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाल झाली असुन लवकरच तेथे भुसंपादन होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com