तांदुळनेर येथे महिलेला केली लाथा बुक्क्यांनी मारहाण

तांदुळनेर येथे महिलेला केली लाथा बुक्क्यांनी मारहाण

राहुरीत चार जणांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) तालुक्यातील तांदुळनेर (Tandulner) येथे तुळसाबाई धोत्रे यांच्या घरात अनधिकृतपणे घुसून कुर्‍हाडीच्या तुंब्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केल्याची घटना दि. 6 जुलै रोजी रात्री घडली. याबाबत राहुरी पोलिसांत (Rahuri Police Station) चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात (crime was filed) आला आहे.

तुळसाबाई एकनाथ धोत्रे वय 70 वर्ष राहणार तांदुळनेर तालुका राहुरी, यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, रात्री अकरा वाजे दरम्यान तुळसाबाई व त्यांचा मुलगा घरात असताना यातील आरोपी (Accused) हे अनाधिकृतपणे घरात घुसले आणि म्हणाले, तुम्ही आमच्या पुतण्याला आमच्या बद्दल वाईट शिकवितात. असे म्हणून कुर्‍हाडीच्या तुंब्याने फिर्यादी तुळसाबाई व त्यांचा मुलगा विश्वनाथ धोत्रे याला मारहाण (Beating) करुन जखमी (Injured) केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी (Death threats) दिली.

यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन आरोपी अक्षय मच्छिंद्र धनवटे, मच्छिंद्र बाळासाहेब धनवटे, चंद्रकला मच्छिंद्र धनवटे, राणी अक्षय धनवटे सर्व राहणार तांदुळनेर, तालुका राहुरी या चारजणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल (Filed a charge of Beating) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com