तांदळे टोळीला मोक्काच्या गुन्ह्यात 10 दिवसांची पोलीस कोठडी

तांदळे टोळीला मोक्काच्या गुन्ह्यात 10 दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सराईत गुन्हेगार नयन तांदळेसह पाच जणांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी विशेष मोक्का न्यायालयात न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने पाचही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नयन राजेंद्र तांदळे (वय 25 रा. भिस्तबाग चौक, नगर), विठ्ठल भाऊराव साळवे (वय 27 रा. झापवाडी ता. नेवासा), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (वय 23 रा. प्रेमदान, सावेडी), शाहुल अशोक पवार (वय 31), अमोल छगन पोटे (वय 28 दोघे रा. सुपा ता. पारनेर) असे मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपींविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करत आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. कापसे व उपअधीक्षक मिटके यांनी न्यायालयात युक्तीवाद केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com