तांभेरेत तरूणाला कुर्‍हाडीने मारहाण; चार जणांवर गुन्हा

तांभेरेत तरूणाला कुर्‍हाडीने मारहाण; चार जणांवर गुन्हा

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

तुम्ही राहाता ती जागा आमची आहे. त्यामुळे तुम्ही येथे रहायचे नाही, येथून निघून जा. असे म्हणत चारजणांनी मिळून संदिप तांबे यांना कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे दि. 26 एप्रिल रोजी घडली.

संदीप राजेंद्र तांबे (वय 28 वर्षे, धंदा नोकरी, रा. तांबे वस्ती, तांभेरे ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 26 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसात वाजे दरम्यान यातील फिर्यादी संदिप तांबे व त्यांची आई त्यांच्या घरासमोर असताना त्या ठिकाणी आरोपी आले व म्हणाले, तुम्ही राहात असलेली जागा आमची आहे.

तुम्ही येथे राहायचे नाही. तुम्ही येथून निघून जा. त्यावेळी फिर्यादी तांबे हे त्यांना समजावून सांगत असताना त्याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादी व त्यांचे आईला शिवीगाळ करू लागले. त्यावेळी आरोपींनी कुर्‍हाडीच्या उलट्या तुंब्याने फिर्यादी तांबे यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच पायाला लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यावेळी तांबे यांची आई भांडणे सोडविण्यासाठी आली असता त्यांना शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली.

तांबे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रतन रामदास तांबे, किशोर रतन तांबे, प्रवीण रतन तांबे, तेरेजा प्रवीण तांबे सर्व रा. तांबे वस्ती, तांभेरे ता. राहुरी. यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com