कोपरगावात तळीरामांचा हैदोस

दगडफेक करून सामाजिक शांतता भंग || पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कोपरगावात तळीरामांचा हैदोस

कोपरगाव |तालूका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरातील (Kopargav City) अवैध धंद्याचा (Illegal Business) बालेकिल्ला ठरलेले हॉटेल किशोर ग्रॅड (Hotel Kishor Grad) समोरील परिसरामध्ये काही अज्ञात समाजकंटकांनी कडून शुक्रवारी रात्री 15 ते 20 अज्ञातांनी दुकानांची मोडतोड व दगडफेक (Stone Throwing) करून सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रकार घडल्याने कोपरगाव शहरामध्ये (Kopargav Kopargav) एकच खळबळ उडाली आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी 9Police) अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेळीच हस्तक्षेप करून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या तोंड फोडीत दत्त मंदिर (Datt Temple) समोरील फुलांची गाडी, अजय रेडिमेट दुकानाचा बोर्ड आणि किशोर लॉजिंग आदी परिसरामध्ये या समाजकंटकांकडून दगडफेक (Stone Throwing) तसेच दुकानाच्या काचा फोडण्याचा प्रकार झाला आहे. याबाबत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तपासाची चक्रे फिरविण्यात आली 4 संशयितांना ताब्यात घेतले होते.

आकाश परीभाऊ रागपसारे, शुभम केशव रागपसारे, गौरव संजय सरोदे, तुषार संजय ठोकळ व दोन अनोळखी इसम रा .गजानन नगर कोपरगाव या सहा जणांविरुद्ध गु. र. नंबर 277/21 भादवी कलम 160, 427 मुंबई पोलीस कायदा कलम 37,1,3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com