तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील दोघा कर्तव्यदक्ष शिक्षकांचा शुक्रवारी धक्कादायकरित्या अकाली दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यामुळे तळेगाव दिघे परिसरावर शोककळा पसरली. दोघाही शिक्षकांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तळेगाव दिघे येथील प्राथमिक शिक्षक दत्तात्रय गणपत दिघे (वय 47) यांचा शुक्रवारी करोनासदृश आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान नाशिक येथील खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

दत्तात्रय दिघे हे वामनवाडी (तळेगाव दिघे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते. कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून ते परिचित होते. नान्नजदुमाला येथील श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयातील कर्तव्यदक्ष शिक्षक संजय सुखदेव वाघ (वय 45) यांचा कर्करोगाच्या आजाराने मृत्यू झाला.

दोघाही शिक्षकांवर शोकाकूल वातावरणात गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघा कर्तव्यदक्ष शिक्षकांचा धक्कादायकरित्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.