तळेगाव दिघे येथे 38 वर्षीय इसमाची आत्महत्या

तळेगाव दिघे येथे 38 वर्षीय इसमाची आत्महत्या

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे एका 38 वर्षीय व्यक्तीने घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मोहन हिरामण आरणे असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

तळेगाव दिघे येथे मोहन हिरामण आरणे हे राहत होते. मंगळवारी दुपारी घराच्या सिमेंट छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने मोहन आरणे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांची पत्नी कामासाठी बाहेर गेलेली होती, ती दुपारी घरी आल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. गळफास घेतलेल्या स्थितीत मोहन आरणे यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलीस पाटील दत्तात्रय इल्हे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पो. हे. कॉ. लक्ष्मण औटी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली घेतला व पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मेमोनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. लक्ष्मण औटी व पोलीस नाईक बाबा खेडकर, पो. कॉ. राजेंद्र पालवे घटनेचा अधिक तपास करीत आहेत. मोहन आरणे यांनी नक्की आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेने तळेगाव दिघे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com