तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात रस्त्याच्या साईड गटारात पाचशे फुट फरफटत जावून तीन पलट्या खात कार अपघातग्रस्त झाली.

सोमवारी सायंकाळी ( दि. २२ ) ७ वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मालदाड येथील एक कुटुंबिय लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने अंत्यविधीसाठी कार प्रवास करीत होते. दरम्यान ते तळेगाव दिघे गावाच्या दिशेने प्रवास करीत असताना अचानक कार ( क्र. एमएच १५ डीसी ९३७८ ) रस्त्याच्याकडेच्या साईड गटारात जावून तीन लट्या खात शेजारील शेतात अपघातग्रस्त झाली.

तळेगाव दिघे शिवारातील हॉटेल सौरभनजीक ही अपघाची घटना घडली. या अपघातात कारमधील बाबासाहेब नवले ( वय ४० वर्षे ), बाजीराव नवले ( वय ५० वर्षे ) व नंदा नवले ( वय ४५ वर्षे सर्व रा. मालदाड ) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी मदतकार्य करीत जखमींना उपचारार्थ संगमनेर येथील धन्वंतरी रुग्णालयात हलविले.

अपघात इतका भीषण होता की कारची उजव्या बाजूचे चाक तुटले व दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघाताबाबत स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना कळविले. मात्र संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातून या अपघाताची सविस्तर माहिती उपलब्ध होवू शकली नाही.