महिला सरपंचांसह तलाठी, पोलिस पाटील यांना वाळूतस्कराची शिवीगाळ

ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरून रोखली वाळूतस्करी
महिला सरपंचांसह तलाठी, पोलिस पाटील यांना वाळूतस्कराची शिवीगाळ

राहुरी | प्रतिनिधी

राहुरी (Rahuri) तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मुळा (Mula River) व प्रवरा नदीपात्रातून (Pravara River) महसूल व पोलिसांच्या (Police) छुप्या आशिर्वादाने वाळू तस्करी जोमात सुरू आहे. तालुक्यातील पाथरे खुर्द (Pathare khurd) येथे प्रवरा नदीपात्रातून खुलेआम वाळू तस्करी (Sand smuggling) सुरू असताना ग्रामस्थांनी ती रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करून नदीपात्रात तयार केलेले रस्ते खोदून ठेवले. मात्र, पाथरे खुर्द येथील एका वाळू तस्कराने दुसर्‍याच दिवशी पुन्हा खड्डे बुजवून रस्ता तयार केला. आता पुन्हा खुलेआम वाळू तस्करी सुरू आहे.

दरम्यान, बेकायदेशीर वाळू तस्करी (Illegal sand smuggling) रोखण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या महिला सरपंचांसह तलाठी, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. याप्रकरणी महिला सरपंचांसह सर्वांनीच राहुरी येथे तहसील कार्यालयात (Rahuri Tehsil Office) धाव घेत वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे.

महिला सरपंचांसह तलाठी, पोलिस पाटील यांना वाळूतस्कराची शिवीगाळ
टाकळीमियात चोरट्यांचा धुमाकूळ; मेडिकल, किराणा दुकान, घरांना केले लक्ष

गेल्या अनेक दिवसांपासून प्रवरा नदीपात्रातून बेसुमार व बेकायदेशीर खुलेआम वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्कराला महसूल प्रशासनाचा आर्थिक आशिर्वाद असल्याने रात्रंदिवस पात्रातून वाळू उपसा सुरू असतो. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून वाळू तस्कराच्या दहशतीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

वाळू तस्कराने वाळू उपशासाठी लागणारी वाहने नदीपात्रात जाण्यासाठी चक्क रस्ते तयार केले आहेत. ते रस्ते संतप्त ग्रामस्थांनी गुरूवारी दुपारी खणून बुजून टाकले. मात्र, गुरूवारी रात्री वाळू तस्कराने हे रस्ते पुन्हा तयार करून खुलेआम वाळू उपसा सुरू केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊन वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर वाळू तस्कराने महिला सरपंचांसह सर्वांना शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

दरम्यान, वाळू तस्कराच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) सुमारे 150 ग्रामस्थांचे सह्यानिशी निवेदन देण्यात आले असून पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com