नेवासा तालुक्यात तलाठ्याला मारहाण

नेवासा तालुक्यात तलाठ्याला मारहाण

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील जेऊर हैबती  येथे आपत्ती व्यवस्थापनाचे काम करत असताना कामगार तलाठी गोरक्षनाथ दराडे यांना काही लोकांनी मारहाण केल्याची घटना आज दि.१७ रोजी दुपारी घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री झालेल्या पावसामुळे जेऊर हैबती गावात पाणी साचले होते. त्यामुळे काही राहत्या घरामध्ये पाणी शिरल्याने जेऊर हैबती येथिल तलाठी यांनी पाहनी करून पाणी जाण्यासाठी रस्त्याच्या बाजुचा बुजवलेला चर खोदून नैसर्गिक आपत्तीचे काम करत असतांना कामगार तलाठी गोरक्षनाथ दराडे यांच्यावर काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला.

यात श्री दराडे हे गंभीर जखमी झाले आहेत. कामगार तलाठी दरोडे यांच्या सोबतच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ही मारहाण करण्यात आली आहे. या मारहाण प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com