टाकळीभान ते पंढरपूर पायी दिंडीचे 26 रोजी प्रस्थान वारकर्‍यांमध्ये यंदा उत्साहाचे वातावरण

टाकळीभान ते पंढरपूर पायी दिंडीचे 26 रोजी प्रस्थान वारकर्‍यांमध्ये यंदा उत्साहाचे वातावरण
(File Photo)

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्री साईबाबा प्रतिष्ठान व श्रीराम पायी दिंडी सोहळा आयोजित दोन वेगवेगळ्या पायी दिंड्यांचे टाकळीभान ते श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रविवार दि. 26 जून रोजी सकाळी 7 वाजता प्रस्थान होणार आहे.

श्री क्षेत्र टाकळीभान ते भुवैकुंठ श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी श्री संत साईबाबा प्रतिष्ठान टाकळीभान पालखी पायी दिंडी सोहळा व श्रीराम पायी दिंडी सोहळा आषाढ वारीचे सालाबादप्रमाणे याहीवर्षी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टाकळीभान येथील साईबाबा मंदिरातून तर दुसरा दिंडी सोहळा श्रीराम मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र सराला बेट संस्थानचे स्वानंदसुख निवासी गंगागिरी महाराज व ब्रम्हलीन महंत नारायणगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने तसेच श्री क्षेत्र देवगड संस्थानचे शांतीब्रम्ह भास्करगिरी महाराज व सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या प्रेरणेने या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन गेल्या सात ते आठ वर्षांपासून केले जात आहे. दोन वर्षे करोनामुळे हे सोहळे रद्द झाल्याने वारकरी विठुरायाच्या भेटीपासून वंचित होते. यंदा करोनाचा कहर कमी झाल्याने आषाढ वारीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

या पायी पालखी दिंडी सोहळ्यात गुणीजन, ज्ञानीजन, कलावृंद, विनोदवृंद, गायकवृंद, वादनवृंद, भारुडवृंद, शिर्षासन, अभियान वृंदाची नामावली विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, रुक्मिणी महिला भजनी मंडळ तसेच टाकळीभान, वडाळा महादेव, चिंचविहीरे, श्री गुरुदत्त भजनी मंडळ, टाकळीभान, घुमनदेव, चेंडूफळ, कमालपूर, भोकर, कारेगाव, घोगरगांव, पाचेगांव, पुनतगाव, वांगी, खिर्डी, गुजरवाडी, माळी घोगरगांव, लोणी, बाभळेश्वर येथील वारकरीे सहभागी होणार असून या सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com