टाकळीभान टेलटँक जुलै महिन्यातच तुडूंब भरला

टाकळीभान टेलटँक जुलै महिन्यातच तुडूंब भरला

टाकळीभान (वार्ताहर) / Taklibhan - टाकळीभान पंचक्रोशिला वरदान ठरलेला टाकळीभान टेलटँक (गोविंद सागर) अखेर 15 जुलै रोजीच शासकिय नियमाप्रमाणे तुडुंब भरला आहे. जलसंपदा विभागाच्या कर्मचार्‍यांनी पाणी वापराच्या केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे तांत्रीकदृष्ट्या टेलटँक भरल्याने परीसरातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

टाकळीभान टेलटँक हा या पंचक्रोशितील सुमारे 10 गावांसाठी वरदान ठरलेला आहे. त्यामुळे या परीसरातील शेती हिरवीगार होवून शेतकर्‍यांची आर्थिक बाजू बळकट झालेली आहे. याच कारणाने या टेलटँककडे परीसरातील शेतकर्‍यांचे बारकाईने लक्ष आसते. गेल्या काही वर्षात जलसंपदा विभागाने पाणी वापराचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे यंदा हा टेलटँक 15 जुलैलाच शासकिय नियमाप्रमाणे 16.30 मीटर भरला गेल्याने तांत्रीकदृष्ट्या टेलटँक तुडुंब झाला आहे. गेल्या वर्षी तो 15 ऑगस्ट रोजी भरला गेला होता.

सन 2016 पासुन टेलटँकच्या पाणी वापराबाबत उपकार्यकारी अभियंता, बेलपिंपळगाव शाखेचे शाखा अभियंता महेश शेळके, कालवा निरीक्षक बाळासाहेब जपे, बाळासाहेब कोकणे हे सुयोग्य नियोजन करीतअसल्याने व पाण्याचा योग्य वापर होत असल्याने हा टेलटँक मुदतीपुर्वीच भरला जावून जलसंपदासह शेतकर्‍यांनाही त्याचा फायदा होत आहे. तर वर्षभर टेलटँकची पाणीपातळी टिकुन राहील्याने पाणीपुरवठा योजनांचाही पाणी पुरवठा सुरळीत होत असल्याने आठ ते दहा गावातील पाणी टंचाईचे सावट दुर होण्यासही मदत झालेली आहे. जलसंपदाच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या सुयोग्य नियोजनाचे हे फलित असल्याचे बोलले जात आहे.

टाकळीभान टेलटँक भरण्याचे स्त्रोत असलेले भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणे अद्याप मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. 11 दलघफु क्षमतेच्या भंडारदरा धरणाची पाणी पातळी आज 4 हजार 640 दलघफु आहे तर 8.50 क्षमतेच्या निळवंडे धरणाची पाणी पातळी 1 हजार 140 दलघफु आहे. मात्र टाकळीभान टेलटँक 15 जुलै रोजीच पुर्ण क्षमतेने भरल्याने पुढील रब्बी हंगामही सुखात जाणार असल्याने परीसरातील शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com