टाकळीभान आरोग्य केंद्रात गटविकास अधिकारी धस यांनी घेतला करोना लसिकरणाचा आढावा

टाकळीभान आरोग्य केंद्रात गटविकास अधिकारी धस यांनी घेतला करोना लसिकरणाचा आढावा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान येथे करोनाच्या पहिल्या डोसचे लसीकरण 70 टक्के झाले असून 30 टक्के लसीकरण शिल्लक राहिले आहे. गावात शंभर टक्के लसीकरण पुर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी केले.

टाकळीभान आरोग्य केंद्रात गटविकास अधिकारी धस यांनी घेतला करोना लसिकरणाचा आढावा
Good Bye 2021 : श्रीरामपुरात नागरिकांनी अनुभवला बिबट्याचा थरार

टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये लसीकरणा बाबत गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. धस पुढे म्हणाले की, करोनाच्या ओमायक्रोॅन व्हेरिएंटची जिल्ह्यात एण्ट्री झाली असून श्रीरामपूर येथे एक रूग्ण अढळून आला आहे. त्यामुळे करोनाचा धोका वाढला आहे. येथे करोना लसीकरण 70 टक्के झाले असून 30 टक्के लसीकरण होणे अद्यापी बाकी आहे. लसीकरण शंभर टक्के होण्यासाठी प्रयत्न करावेत. लस न घेणार्‍यांचे रेशन व इतर सुविधा बंद कराव्यात, रेशन दुकानदारांनी लस न घेतलेल्या नागरिकांना रेशन देवू नये, असे उपस्थित असलेल्या रेशन दुकांनदारांना त्यांनी सांगितले, सार्वजनीक ठिकाणी मास्कचा वापर करावा व मास्क न वापणार्‍यांवर व नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करावी, असे त्यांनी ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाला सांगितले.

टाकळीभान आरोग्य केंद्रात गटविकास अधिकारी धस यांनी घेतला करोना लसिकरणाचा आढावा
राहाता बाजार समितीत कांदा, सोयाबिनला काय मिळाला भाव वाचा..

टाकळीभान तालूक्यातील मोठे गाव असल्याने लसीकरणासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. पहिला डोस झाला आहे आशांना दुसरा डोस घेण्यासाठी व लस न घेतलेल्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. दुकानदार, भाजी विक्रेते यांचे लसीकरण झाले आहे किंवा नाही, याची खात्री करावी व त्यांचे लसीकरण झाले नसेल तर त्यांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरण शंभर टक्के होण्यासाठी प्रभागनिहाय लसीकरण करावे, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या प्रभागात जावून लसीकरणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन धस यांनी केले.

टाकळीभान आरोग्य केंद्रात गटविकास अधिकारी धस यांनी घेतला करोना लसिकरणाचा आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

बैठकीपुर्वी धस यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली तसेच दुकानात जाऊन दुकानदारांना करोना लसीकरणाबाबत जनजागृती व सुचना केल्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव, अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा महाविकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, सरपंचपती यशवंत रणनवरे, ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे, सुनिल बोडखे, जयकर मगर, पोलिसमित्र बाबा सय्यद, पत्रकार विजय देवळालकर, बापूसाहेब नवले, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com