टाकळी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

टाकळी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील टाकळी विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.

सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून 8 उमेदवार, महिला राखीव मतदार संघातून 2 उमेदवार तसेच इतर मागासवर्गीय मतदार संघातून 1 व अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून 1 उमेदवार अशाप्रकारे उमेदवारांची निवड करण्यात आली.

बिनविरोध निवड झालेले पात्र उमेदवार- सर्व साधारण कर्जदार मतदार संघातून गुलाबराव पंढरीनाथ शेवाळे, नामदेव त्र्यंबक गाडे, संतोष रेवन्नाथ तिकांडे, विजय मनोहर दातखिळे, रेवननाथ आबाजी तिकांडे, निवृत्ती चिमाजी दातखिळे, चंद्रकांत रामनाथ तिकांडे, म्हतू महादू दातखिळे, महिला राखीव मतदार संघातून सौ. रुक्मिणी रामकृष्ण तिकांडे, सौ. सत्यभामा राधाकिसन दौंड, इतर मागासवर्गीय मतदार संघातून विलासराव शहाजी शेवाळे, अनुसूचित जाती आणि जमाती संघातून नामदेव तुळशीराम दिघे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्था बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक गुलाबराव शेवाळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामहारी तिकांडे, बबनराव तिकांडे, विलासराव शेवाळे, नामदेव गाडे, डॉ. जनार्दन मोरे, सागर तिकांडे, नितीन वाघ, संतोष तिकांडे, साहेबराव दातखिळे, दत्ताराम दातखिळे, बाळासाहेब शिंदे यांचे योगदान लाभले. नूतन संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Stories

No stories found.