टाकळीढोकेश्वर विद्यालयातील 16 जणांची करोनावर मात

14 विद्यार्थी 2 शिक्षकांचा सामावेश
टाकळीढोकेश्वर विद्यालयातील 16 जणांची करोनावर मात

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथील केंद्रीय नवोदय विद्यालयातील 90 करोना बाधितांपैकी 16 जणांनी करोनावर मात केली आहे. यात दोन शिक्षक व 14 विद्यार्थ्यांचा सामावेश आहे. आमदार निलेश लंके यांच्या हस्ते त्यांना आरोग्य साहित्य भेट देत निरोप देण्यात आला .

टाकळीच्या नवोदय विद्यालयात करोनाचा विस्फोट होऊन 84 विद्यार्थी व 6 शिक्षक अशा एकूण 90 जणांना करोनाची बाधा झाली होती. सलग तीन चार दिवस या विद्यालयात बाधित आढळून येत असल्याने शिक्षण क्षेत्रासह आरोग्य व महसूल विभागात खळबळ उडाली होती. निवासी शाळेत विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. जिल्हाधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर यानी टाकळी येथे विद्यालयात व विद्यार्थी उपचार घेत आसलेल्या पारनेर ग्रामीण रुग्णालयाला भेटी देत विद्यार्थ्यांच्या आरोग्यकडे लक्ष दिले.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी या विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारीत जोपर्यंत शेवटचा विद्यार्थी शिक्षक बरा होऊन घरी जात नाही तोपर्यंत मी स्वतः लक्ष देणार म्हणत मुलाच्या उपचारावर बारीक लक्ष दिले.वेळीवेळी भेटी देत विद्यार्थ्यांबरोबर स्लेफी काढत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. अखेर रविवारी पहिल्या टप्प्यातील 14 विद्यार्थी व दोन शिक्षक पूर्ण बरे झाल्याने आमदार लंके यांनी या सर्वाचा सन्मान करत घरी निरोप दिला. यावेळी आमदार लंके यानी पालक, डॉक्टर व अधिकारी या सर्वांचा सन्मान केला.

रविवारी आमदार लंकेच्या उपस्थिती 14 विद्यार्थी व दोन शिक्षक करोनावर मात करून सुखरूप घरी गेले. उर्वरीत विद्यार्थी व शिक्षकांची प्रकृती उत्तम असून त्यांनाही लवकरच घरी सोडले जाणार आहे . दरम्यान पुणे येथे तपासणीसाठी पाठवालेल्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

- डॉ प्रकाश लाळगे, तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com