टाकळी ढोकेश्वरला एटीएम पळवण्याचा प्रयत्न

28 लाखांची रोकड वाचली
टाकळी ढोकेश्वरला एटीएम पळवण्याचा प्रयत्न

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर (Parner) तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर (Takli Dhokeshwar) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) एटीएम (ATM) चारचाकी वाहनास बांधून तोडून पळवण्याचा प्रयत्न चोरट्यांनी (thieves) केल्याची घटना गुरूवारी (दि.26) पहाटे घडली. परंतु एटीएम (ATM) अर्ध्यावर तुटल्याने व मोठा आवाज झाल्याने चोरट्यांनी (thieves) पळ काढला. दरम्यान, एटीएम (ATM) मधील 28 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित असल्याचे बँकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी, टाकळी ढोकेश्वर (Takli Dhokeshwar) येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) शाखेजवळच एटीएम (ATM) आहे. चोरट्यांनी (thieves) पहाटे 2 वाजेच्या सुमारास एटीएम (ATM) तोडण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी (thieves) एटीएम (ATM) तोडण्यासाठी लोखंडी तारेचा वायर रोप (Wire Rope) एटीएम मशीनला (ATM Machine) बांधून मालवाहतूक पिकपला बांधून मशिन पायापासून तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशिन पूर्ण न निघता मधुनच तुटून मोठा आवाज झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला.

मशिनमधील (ATM Machine) 28 लाख 29 हजार 100 रुपयांची रक्कम सुरक्षित असल्याचे देखभाल व्यवस्थापक विश्वास कसबे यानी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, पारनेरचे पोलीस निरीक्षक घमश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले, हवालदार लोणार, सुरज कदम यांच्यासह नगर येथील ठसे तज्ज्ञ यांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र, सर्व पैसे सुरक्षीत असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले करित आहेत.

सात मिनिटांच्या फरकाने चोरांचे धाडस

या एटीएम चोरीच्या घटने अगोदर पारनेरचे पोलक्षस निरीक्षक घनश्याम बळप आणि त्यांच्या मोठ्या फौजफाट्याने वासुंदा बायपास चौकात तपासणी नाका लावला होता. मध्यरात्रीनंतर 1 वाजून 47 मिनिटांपर्यंत वाहन तपासणी चालू होती. मात्र, चेकपोस्ट संपताच चोरट्यांनी 1 वाजून 54 मिनिटांनी टाकळी ढोकेश्वरला एटीएमवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com