नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देवून साखरेपेक्षा अधिक दर देण्याचा निर्णय घेतल्याने

परकीय चलनाची बचत होईल असे राज्य साखर कारखाना समितीचे माजी प्रदेशाध्यक्ष दिनकरराव ताके यांनी म्हटले आहे.

याबाबत पत्रकात त्यांनी म्हटले की, उसाच्या रसापासून तयार इथेनॉलला सर्वाधिक भाव मिळत आहे. कारखान्याने एक टन उसाची 12 टक्के रिकव्हरी धरली आहे. यात सी हेवी पद्धतीने 120 किलो साखर, 40 किलो मळी व 10.27 लिटर इथेनॉल तयार होते. यात सारखेचा आजचा 31 रुपये किलोचा भाव धरला तर साखरेपासून 3720 रुपये, इथेनॉलचा 45.69 रुपये प्रतिलिटर दर धरला तर 469.24 रुपये असे एकूण 4189.24 रुपये उत्पन्न मिळत आहे.

म्हणजे प्रत्यक्ष उत्पन्नात दीडशे ते दोनशे रुपये जास्त मिळत आहेत. यासोबतच पीपीपी बॅग, शुगर हॅण्डलिंग, गोदाम शिफ्टिंग, केमिकल याचा मोठा खर्च वाचला आहे. इतकेच नव्हे तर गोदामात सात ते आठ महिने पडून राहणार्या साखरेवरील व्याजाचीही बचत झाली आहे. कारखान्यांना साखरेच्या पेमेंटसाठी बराच वेळ लागतो पण इथेनॉलचे पेमेंट मात्र तातडीने मिळत आहे.

कारखान्यांनी पारंपारिक पद्धतीने इथेनॉलची निमिर्ंती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांना आर्थिक मदत करण्याचे ठरवले आहे. त्याचा कारखान्यांनी फायदा घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.