अहमदनगर (प्रतिनिधी) -

वाळकी (ता. नगर) येथील ओमकार भालसिंग यांच्यावर खूनी हल्ला करणारा आरोपी विश्वजीत कासार व त्याचे साथीदार

सुनील अडसरे, शुभम लोखंडे, सचिन भामरे, इंद्रजीत कासार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मयत मुलाची आई लता भालसिंग व वाळकी ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन अधीक्षक पाटील यांना देण्यात आले आहे.

सदर आरोपींविरूद्ध जिल्ह्यासह पुणे, कोल्हापूर, जालना जिल्ह्यात खंडणी, खून, दरोडा, अपहरण, जबरी मारहाण, फसवणूक यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हे सर्व जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. विश्वजीत कासार हा त्याचे टोळीचा मुख्य मोरक्या असून तो त्याचे इतर साथीदारांसह कायम गुन्हे करीत असतो.

त्याने आजपर्यंत केलेल्या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे. त्यांच्यापासून समाजास व आम्हा सर्व गावकर्यांना खूप त्रास होत आहे. यामुळे आम्हाला आमचे जीवन धोक्याचे वाटते. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.