राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

पंकज खपके यांना आरोपी मारहाण करत असताना त्यांची पत्नी व मुली भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता

त्यांना देखील आरोपींनी मारहाण करून ब्लेडने वार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे दि. 1 एप्रिल रोजी घडली. पंकज दगडू खपके (वय 43 वर्षे, धंदा मजुरी, रा. लाखरोड टाकळीमिया, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 1 एप्रिल रोजी सायं. साडेसात वाजे दरम्यान फिर्यादी पंकज खपके त्यांच्या घरासमोर असताना आरोपी हे फिर्यादीचे घरासमोर मोटार सायकलवर बसून आले.

फिर्यादीस मारहाण करू लागले. यावेळी फिर्यादीची पत्नी व मुली मनीषा, सोनाली व प्रांजली या घराबाहेर आल्या असता त्यांना आरोपींनी चापटीने व चप्पलाने मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीची मुलगी मनीषा हिला आरोपी पप्पू जगधने याने ब्लेडने डाव्या हाताच्या तळव्यावर मारहाण करून शिवीगाळ केली. जाताना फिर्यादीस व फिर्यादीची पत्नी, मुलींना आरोपी म्हणाले, आता कमी मारहाण केली.

नंतर जास्त मारहाण करू, अशी धमकी दिली. खपके यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दामू जगधने, पप्पू जगधने, अनोळखी इसम, हिराबाई जगधने व दोन अनोळखी महिला अशा एकूण सहा जणांवर गु. रजि. नं. व कलम - 1 277/2021 भादंवि. कलम 324, 143, 147, 148 प्रमाणे मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय पठारे करीत आहेत.