टाकळीमियात चारी फुटून लोकवस्तीत पाणी शिरले

टाकळीमियात चारी फुटून लोकवस्तीत पाणी शिरले

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून जाणार्‍या दौड मनमाड रेल्वे मार्गावरील टाकळीमिया -मुसळवाडी रोडवर रेल्वेने भुयारी मार्ग तयार केला आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी पाटबंधारे विभागाच्या पाण्याच्या चार्‍या आहेत त्या चार्‍यांवर रेल्वे खात्याच्या कॉन्ट्रॅक्टरने पाणी वाहून जाण्यासाठी बांधकाम केले आहे परंतु चुकीचे बांधकाम व पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष यामुळे सदर चारी फुटून येथील रामराव चौधरी, लक्ष्मण चौधरी, बाळासाहेब चौधरी यांच्या घरात तसेच जनावरांच्या गोठ्यात व कांदाचाळीत पाणी गेल्याने चौधरी यांचे मोठे नुकसान झाले आहे.

रेल्वेने मुसळवाडी -टाकळीमिया रोडवर भुयारी मार्गाचे बांधकाम केले येथून जाणार्‍या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुने पाटबंधारे खात्याच्या पाण्याच्या चार्‍या आहेत खालच्या बाजूला 36 नं. चारी तर वरच्या बाजूस 35 नं. चारी या चारीचे पाणी जाण्यास रेल्वेच्या कॉन्ट्रॅक्टरने खालच्या चारीवर भुयारी तर वरच्या चारीवर रस्त्याच्या वरून सिमेंटकाँक्रिटचे बाधकाम करून चारी तयार केली. मात्र ही चारी बांधत असताना जुन्या चारीची लेव्हल केली नाही व त्यामुळे मूळचारीस मागच्या बाजूस जास्त पाणी फुगवटा होतो. त्यामुळे चारी नेहमीच फुटते आताही चारी फुटून चौधरी यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या चारीचे बांधकाम होत असताना या चारीतून येत असलेले अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरने सिमेंट नळ्या टाकून पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असताना त्यांनी दुर्लक्ष केले व पाटबंधारे खात्यानेही दुर्लक्ष केले. चौधरी यांनी अनेकवेळा ही बाब लक्षात आणून दिली. मात्र त्यांनी काम केले नाही. रेल्वेच्या या भुयारी मार्गात चारीला पाणी आल्यावर व पावसाळ्यात पाणी साठून वाहतूक बंद पडते त्यामुळे रेल्वे खात्याने व पाटबंधारे विभागाने या पाण्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी या मार्गावरील टाकळीमिया व मुसळवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com